अपहरण... कहा से दिमाग लाते हो यार ? इतनी क्रिएटिव्हिटी!

Ishq Mein Marjawan 2 Scenes viral on social mediaइश्क में मरजावां 2 सीन सोशल मीडियावर व्हायरल
गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 23 सप्टेंबर) - इश्क में मरजावां २ या मालिकेतील एक सीन सोशल मीडिया वर चांगलाच व्हायरल झाला आहे, या सीन ला व मालिकेला नेटकर्यांनी जबरदस्त ट्रोल केले आहे. 'इश्क में मरजावां २' या मालिकेतील अपहरणाचा सीन पाहून हसावं की रडावं असं वाटू शकतं. त्यमुळे मालिकांचा दर्जा किती खालावत चालला आहे हे सत्य समोर येत आहे. करणारा हा सीन आहे. हा सीन पाहून सोशल मीडियावर मालिकेच्या टीमला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं.
अभिनेत्री हेली शाह मालिकेत रिद्धिमाची मुख्य भूमिका साकारत आहे. एका सीन मध्ये रिद्धिमा चालताना अचानक एका बॅगला पाय लागून धडपडते आणि तिचं डोकं कपाटावर आपटतं.. आणि ती थेट त्या बॅगमध्ये पडते, जी तिच्या अपहरणासाठी वापरण्यात येणार असते. यानंतर, एक माणूस ती बॅग घेऊन स्विमिंग पूलमध्ये फेकतो.
हा सीन पाहून प्रेक्षक स्वतःचं हसू रोखू शकले नाहीत. याचे अनेक मीम्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लेखक काय विचार करून हा सीन लिहित होता असा प्रश्नही काही यूझरने विचारला. तर काही युजर्सने, कोणी इतके मूर्ख कसे मजेदार असू शकते. मला या देखाव्याच्या लेखकाचे नाव जाणून घ्यायचे आहे. असे म्हटले आहे.
![]() |
क्लिप पाहण्यासाठी खलील लिंक चा उपयोग करा |
- भारतीय दूरचित्रवाणी मालिकांची दयनीय अवस्था.
- हे सर्व काही बुलशिट आणि तर्क नसलेले आहे . आश्चर्य वाटतं की, लोक खरोखरच इतके मूर्ख आहेत किंवा प्रॉडक्शन हाऊसल तरी ब्रेन नसावा
- पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी मी उत्सुक आहे. ती बुडते का? त्याने तिला वाचवले? तिचे सुटकेस कोणी झिप केले? असे बरेच प्रश्न आहेत, याला कोणतेही तर्कशास्त्र नाही.
- अवश्य पहा ... काय संकल्पना ... अरे देवा! ohh my god
- बालाजीला सलाम
- ते एम्मी, अकॅडमी, फिल्मफेअर असे सर्व पुरस्कारा साथी पात्र आहेत.
- रसोडेमे कोण था च्या धर्तीवर सुटकेस मी कोण था ???
- कहा से दिमाग लाते हो यार ? इतनी क्रिएटिव्हिटी !
अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत.
No comments