उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना कोरोना

Higher and Technical Education Minister Uday Samant's Corona test positive
गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 29 सप्टेंबर 2020) - राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असून, संपर्कात आलेल्या नागरिकांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी व आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे की, गेले दहा दिवस स्वतः विलगिकरनात आहे. मी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली. रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी गेले 10 दिवसात कोणाच्याही संपर्कात नसल्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता अगदी कमी आहे. तरीही माझ्या संपर्कात आलेल्यानी काळजी घ्यावी. मी ठणठणीत आहे पुढच्या आठवड्यात जनतेच्या सेवेत रुजू होणार असल्याचे ट्विट केले आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासंबंधी वेगवेगळ्या मिटींगला हजर राहिले होते. काल त्यांना कोरोनाची लक्षणे जाणवल्यामुळे कोरोना चाचणी केली असता, ती पॉझिटिव्ह निघाली. सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थित असून ठणठणीत असून उपचार घेतल्यानंतर जनता व विद्यार्थ्यांच्या सेवेत पुन्हा आपण रुजू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
No comments