गिरवी येथे गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण संपन्न

फलटण - महात्मा फुले कृषी विद्यापीठ संलग्नित व शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचलीत रत्नाई कृषी महाविद्यालयाच्या कृषीदुतामार्फत गिरवी येथे गांडूळ खत निर्मिती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रासायनिक खतांच्या अनियंत्रित वापरामुळे जमिनीचा व उत्पादनाचा दर्जा कमी होत आहे यावर उपाय म्हणून गांडूळ खत हा सर्वोत्तम पर्याय आहे. कमीत कमी खर्च करून आपण उत्तम दर्जाचे गांडूळ खत कसे निर्माण करू शकतो याची माहिती त्यांनी शेतकऱ्यांना दिली. या कार्यक्रमासाठी विषय शिक्षक प्रा. एस. आर. अाडत यांचे मार्गदर्शन लाभले.
शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज चे अध्यक्ष- मा.जयसिंह मोहिते-पाटील, महाविद्यालयाचे समन्वयक- डाॅ.डी.पी.कोरटकर, प्राचार्य- आर.जी. नलावडे ,कार्यक्रम समन्वयक-प्रा.एस.एम. एकतपुरे, कार्यक्रम अधिकारी- प्रा. एस. आर. आडत,प्रा.डी.एस.मेटकरी यांच्या मार्गदर्शनाने कृषीकन्या प्राजक्ता फरांदे यांच्यामार्फत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम गिरवी येथे घेण्यात येत आहे.
No comments