कोविड 19 : अडुळसा आणि गुळवेलचा आयुष मंत्रालयाकडून चिकित्सा अभ्यास सुरू

Covid 19: Medical study of Adulsa and Gulvel started by AYUSH Ministry
फलनिष्पत्ती, वैद्यकीय आणि प्रयोगशाळा याविषयीचे निकष यासह तपशीलवार प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या अभ्यासासाठी केस रिपोर्ट फोरम या अनोख्या मंचाचा उपयोग करण्यात येणार आहे. अभ्यासाच्या मार्गदर्शक सूचनांचा, आधुनिक वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रातल्या तज्ञांनी आढावा घेतला असून त्यांच्या सूचनांचाही यात समावेश करण्यात आला आहे. आयईसी, संस्थात्मक आचार समिती कडून आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतरच हा अभ्यास सुरु करण्यात येईल.

या प्रकल्पामध्ये याचा विचार करण्यात येईल-
- अडुळसा अर्क आणि गुळवेल अर्क यांचा गुण, SARS-CoV2 रुग्ण, लक्षणे नसलेल्या किंवा कोविडची सौम्य लक्षणे असणाऱ्यांसाठी अडुळसा-गुळवेल अर्काचा उपचार व्यवस्थापनासाठी उपयोग तसेच याचा व्हायरल रिप्लीकेशनच्या वेगावर होणारा परिणाम.
- या मिश्रित अर्कामुळे कोविड-19 शी संबंधित रोगदर्शक महत्वाच्या घटकांमध्ये काही बदल जाणवतात का ?हे अभ्यासणे
भारतीय आरोग्यविषयक परंपरेत अडुळसा आणि गुळवेल यांचा वापर अनेक रोगांमध्ये करण्या येत असून तो उपयुक्त ठरला आहे. म्हणूनच या अभ्यासाची फलनिष्पत्ती संपूर्ण आयुष क्षेत्रासाठी महत्वाची आहे.
No comments