अभिनेत्री दीपिका एनसीबी कार्यालयात हजर

गंधवार्ता वृत्तसेवा (दिनांक 26 सप्टेंबर 2020) - अभिनेत्री दीपिका पदुकोन ड्रग्ज प्रकरणात समन्स प्रमाणे चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात हजर झाली आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीत चित्रपट क्षेत्रातील ड्रग्स प्रकरण पुढे आले आहे. केलेल्या चौकशीमध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोनचे नाव पुढे आले आहे. त्यामुळे आज अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) दीपिका पदुकोन ल समन्स बजावले होते.
अमली पदार्थ विरोधी पथकाने अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावनी करून चौकशीस हजर राहण्यास कळवले होते. त्यानुसार आज दीपिका पदुकोणची चौकशी होणार आहे.
No comments