5 मृत्यू तर 70 कोरोना पॉझिटिव्ह फलटण तालुक्यात

Corona virus phaltan updates : 5 death and 70 corona positive
फलटण दि. 17 सप्टेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 17 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 70 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 34 व्यक्ती तर ग्रामीण भागात 36 रुग्ण सापडले आहेत. तर 5 व्यक्ती मृत पावली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
फलटण शहरात 34 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये मलठण 6, लक्ष्मीनगर 4, सगुणामाता नगर 3, शिवाजीनगर 3, विद्यानगर 2, धनगरवाडा 2, मंगळवार पेठ 1, निर्मलादेवी नगर 1,गजानन चौक 1, मारवाड पेठ 1, बुधवार पेठ 2, दत्तनगर 1, रविवार पेठ 1, पवार गल्ली 1, संजीवराजे नगर 1 व फलटण असा पत्ता दिलेले 4 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
ग्रामीण भागात 36 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये जाधववाडी 4, ताथवडा 1, साखरवाडी 4, तरडगाव 2, काळज 1, धुळदेव कर्णे वस्ती 1, तावडी 1, सस्तेवाडी 1, वाठार निंबाळकर 2, सासकल 1, वडले 1, कोळकी 1, शेरेचेवाडी ढवळ 1, अरडगाव 1, फरांदवाडी 1, राजुरी 1, चौधरवाडी 1, निरगुडी 1, फडतरवाडी 1, तरडफ 1, तोंडले 1, गिरवी 1, साठे 1, शिंदेनगर 1, तांबवे 1, शिंदेमळा 2, पवारवाडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.
5 रुग्णाचा मृत्यू
महादेवनगर फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, जाधववाडी फलटण येथील 55 वर्षीय पुरुष, तरडगाव फलटण येथील 65 वर्षीय व 87 वर्षीय पुरुष, फडतरवाडी येथील 61 वर्षीय पुरुष या कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
No comments