Breaking News

"ऋतू हिरवा, ऋतू बरवा" वरंधा घाटातील सुंदर दृश्ये

 

पुण्याहून भोरमार्गे महाडकडे जाणाऱ्या राज्यमार्गावर वरंध घाट तथा वरंधा घाट आहे. घाटाच्या समोरच्या डोंगरकुशीत, गर्द झाडीत समर्थ रामदासस्वामींची शिवथरघळ आहे. वरंधा घाटरस्त्यावर मुख्य आकर्षण असलेले वाघजाई माता मंदिर आहे. 

        पश्चिम घाट पर्वतरांगांच्या सीमेवर वसलेल्या या वरंधा घाटात अनेक प्रकारची रमणीय धबधबे, तलाव आणि घनदाट जंगल असून त्यात विविध प्रकारची जंगली प्राणी आपणास पाहायला पहायला मिळतात. सध्या पावसाळ्यामध्ये सर्वत्र हिरवाई अवतरली आहे. हा निसर्ग पाहून "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" या गीताची आठवण झाली नाही तरच नवल! दरीतील हिरवाई आणि धबधब्यांवरील सुंदर दृश्ये टिपली आहेत फलटण येथील रियाज आतार यांनी. 




No comments