... बहुतेक फुलपाखराला ही फोटो काढून घेणे आवडत असावे
![]() |
ऊसाच्या वाळलेल्या पाल्यावर हे टायगर फुलपाखरु भिरभिरत होतं... थांबून याचा अंदाज घेतला आणि लांबूनच फोटो क्लिक केले... बहुतेक या फुलपाखराला ही फोटो काढून घेणे आवडत असावे, सुरवातीला हे दबकत इकडे तिकडे फिरत होते, पण माझा ही अंदाज घेऊन हे पाखरु एका वाळलेल्या पानावर निवांत बसले... मी खूप जवळून फोटो घेताना देखील शांत बसून होते. एकदा का तुम्हाला समोरुन धोका नाही हे कळलं की निसर्गातील हे जीव तुमच्या सहवासात भारावतात.
No comments