Breaking News

रडावसं वाटतंय, भरून आलंय....सिद्धार्थ जाधव

 

        Actor Siddharth Jadhav's emotional tweet

        गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 24 सप्टेंबर 2020) - कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली, रिकामी असलेली  चित्रपटगृह आणि नाट्यगृह पाहून  अभिनेता सिद्धार्थ जाधव भावनिक झाला असून त्याने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना विकत करताना म्हटले की, अशी रिकामी नाट्यगृह पाहून  ढसाढसा रडावसं वाटतंय, भरून आलंय... अशी भावना व्यक्त करतानाच, कोरोना काळ अधिक कठीण होतोय, सर्वांनी काळजी घ्या असे संगितले आहे. 

        अभिनेता सिद्धार्थ जाधव  याने ट्विट मध्ये म्हटलय की,   शाळेच्या गॅदरिंगपासून ज्या स्टेजवर उभा राहयला शिकलो,  नाटकं पाहीली, भरलेल्या प्रेक्षकांच्या साथीनं प्रयोग केले, त्या नाट्यगृहाचे असे फोटो पाहून ढसाढसा रडावसं वाटतंय, भरून आलंय... २०२० चा हा  संकटकाळ  अधिक कठीण होतोय,  ते पाहवत नाही. सर्वांसाठी प्रार्थना...काळजी घ्या!

अभिनेते सिद्धार्थ जाधव यांनी शेअर केलेला रिकाम्या नाट्यगृहाचा फोटो 


No comments