Breaking News

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना कोरोना

 

        Urban Development Minister Eknath Shinde's Corona test positive

            गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 24 सप्टेंबर 2020) - राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची  कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.   बुधवारी एकनाथ शिंदे यांनी करोनाची चाचणी केली होती, आज दुपारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ट्विटर वर ही माहिती देऊन,  गेल्या काही दिवसांत त्यांच्या सपंर्कात आलेल्या व्यक्तींनी करोनाची चाचणी करून घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.

        नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी  आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, काल मी माझी कोव्हीड-१९ ची तपासणी करून घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने प्रकृती ठीक आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि स्वतःची कोव्हीड चाचणी करून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, ही विनंती...

        भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर एकनाथ शिंदे हे प्रत्यक्ष घटनास्थळी हजर होते.  भिवंडी महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केलेल्या जखमींची ही त्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन विचारपूस केली होती. तसेच  मराठा आरक्षणासंदर्भातील चर्चेतही एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. 

No comments