भगवान जाने क्या होगा मुंबई का?... कंगनाचा मुख्यमंत्री व खा.राऊत यांच्यावर पुन्हा निशाना

Kangana targets Chief Minister Uddhav Thackeray and MP Sanjay Raut
गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 24 सप्टेंबर 2020) - मुंबई भिवंडी येथील इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आज अभिनेत्री कंगना रनौत हिने ट्विटरच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्यावर पुन्हा निशाणा साधला आहे, तुमच्या निष्काळजीपणामुळेच भिवंडी येथील निष्पाप नागरिक मारले गेले असल्याचे कंगनाचे म्हणणे आहे.
कंगनाने आपल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, उद्धव ठाकरे, संजय राऊत... जेव्हा माझे घर बेकायदेशीरपणे मोडले जात होते, त्यावेळी या इमारतीकडे (दुर्घटनाग्रस्त इमारतीकडे) इतके लक्ष दिले गेले असते, तर आज सुमारे पन्नास लोक जिवंत राहिले असते, पुलवामामध्ये पाकिस्तानचे जेवढे जवान मारले गेले नसतील तेवढे निष्पाप नागरिक तुमच्या निष्काळजीपणामुळे मरण पावलेत, मुंबईचे काय होईल हे देवाला ठाऊक आहे.
उद्धव ठाकरे, संजय राउत @mybmc जब मेरा घर ग़ैर क़ानूनी तरीक़े से तोड़ रहे थे, उस वक्त उतना ध्यान इस बिल्डिंग पे दिया होता तो आज यह लगभग पचास लोग जीवित होते, इतने जवान तो पुलवामा में पाकिस्तान में नहीं मरवाए जितने मासूमों को आपकी लापरवाही मार गयी, भगवान जाने क्या होगा मुंबई का.
No comments