Breaking News

39 कोरोना पॉझिटिव्ह ; फलटण शहरात 14, ग्रामीण भागात 25

 

       39 corona positive; 14 in Phaltan city, 25 in rural areas
  फलटण 3 सप्टेंबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) -  आज दि. 3 सप्टेंबर 2020 रोजी जाहीर करण्यात आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण शहर व तालुक्यात एकूण 39 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये शहरात 14 रुग्ण व ग्रामीण भागात 25 रुग्णांचा समावेश आहे.  आज जाहीर केलेले अहवाल हे दि. 2 सप्टेंबर  या दिवशी घेण्यात आलेल्या चाचण्यांचे अहवाल असून यामध्ये रेग्युलर चाचण्या (RT-PCR) व रॅपिड अँटीजन चाचण्यांचा समावेश असल्याची माहिती गंधवार्ताला उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली. 

RT-PCR चाचण्यांमध्ये
     दि. 2 सप्टेंबर रोजी नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवलेल्या (RT-PCR) चाचण्यांमध्ये 7 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये शहरातील 2 व्यक्ती व ग्रामीण भागातील 5 व्यक्तींचा समावेश आहे.
 
यामध्ये
फलटण शहरात शुक्रवार पेठ फलटण येथील 36 वर्षीय महिला व 14 वर्षीय मुलगा यांच्या कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत.

ग्रामीण भागामध्ये 5 व्यक्तींच्या चाचण्या पॉझिटिव्ह आले असून यामध्ये धुमाळवाडी येथे 25 वर्षीय 24 वर्षीय 22 वर्षे पुरुषांचा समावेश आहे तर गिरवी येथे 60 वर्षीय पुरुष विठ्ठलवाडी येथे 35 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

रॅपिड अँटीजन चाचण्यांमध्ये
दि. 2 सप्टेंबर रोजी केलेल्या रॅपिड अँटीजन चाचण्यांमध्ये 32 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. यामध्ये शहरातील 12 व्यक्ती व ग्रामीण भागातील 20 व्यक्तींचा समावेश आहे.
फलटण शहरात रिंग रोड फलटण येथे 58 वर्षे पुरुष, मंगळवार पेठ येथे 51 वर्षीय, 58 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथे 26 वर्षीय पुरुष, महतपुरा पेठ मलटण येथे 75 वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर येथे हे 1 वर्षीय बालिका, गिरवी नाका, आनंद नगर येथे 2 वर्षीय बालक, 5 वर्षीय बालिका, 29 वर्षीय महिला,  67 वर्षीय पुरुष, कसबा पेठ फलटण येथे 46 वर्षे पुरुष,बुधवार पेठ येथे 1 महिलेचा समावेश आहे.

ग्रामीण भागात कोळकी येथे 7 व्यक्तींच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत, यामध्ये कोळकी येथे 30 वर्षीय पुरुष, नरसोबा नगर कोळकी 1 पुरुष, 21 वर्षीय पुरुष,  बुवासाहेब नगर कोळकी येथे 58 वर्षीय पुरुष, 51 वर्षीय महिला, भुजबळ मळा येथे 38 वर्षीय पुरुष, 1 महिला यांचा समावेश आहे.
तरडगाव येथे 50 वर्षीय पुरुष, निंभोरे येथे 37 वर्षीय पुरुष, सासवड येथे 65 वर्षीय महिला, गिरवी येथे 30 वर्षे पुरुष, मिरेवाडी येथे 52 वर्षीय पुरुष, निर्मलपार्क जाधववाडी येथे 20 वर्षीय महिला, सरडे येथे 30 वर्षे पुरुष, गोखळी येथे 34 वर्षीय पुरुष, बरड येथे 32 वर्षे पुरुष, वाजेगाव येथे 1 पुरुष, येथे 1 पुरुष, खामगाव येथे 1 पुरुष, जिंती येथे 1 पुरुष यांच्या कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्या आहेत.

No comments