सातारा जिल्ह्यात 385 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

385 corona patients discharged today in Satara district
सातारा दि. 30 -: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 385 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 778 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
778 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 60, कराड 26, उपजिल्हा रुग्णालय फलटण 65, कोरेगाव 52, वाई 55, खंडाळा 76, रायगांव 96, पानमळेवाडी 97, मायणी 6, महाबळेश्वर 25, दहिवडी 60, खावली 14, मळमावले 28, म्हसवड 19, पिंपोडा 19 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड 80 असे एकूण ७७८ जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने -- 142192
एकूण बाधित -- 37300
घरी सोडण्यात आलेले --- 27458
मृत्यू -- 1140
उपचारार्थ रुग्ण -- 8702
No comments