फलटण शहर व तालुक्यात 347 सार्वजनिक गणपती

फलटण तालुक्यातील 37 गावांमध्ये एक गाव एक गणपती
फलटण : फलटण शहर व तालुक्यात प्रशासनाने घालुन दिलेल्या नियम, निकषांचे पालन करीत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अत्यंत शांततेत, स्वयंशिस्त सांभाळीत गणरायाचे स्वागत करुन नेहमीच्या जागेवर गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबाने परंपरेप्रमाणे आपल्या घरातही गणेशाची प्रतिष्ठापना केली. शहर व तालुक्यात एकुण 347 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामध्ये 37 सार्वजनिक गणेेशोत्सव मंडळांनी एक गाव एक गणपती योजना राबविली आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकुण 134 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गजाननाची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामध्ये जोर व उळुंब या दोन पुर्नवसीत गावठाणामध्ये एक गाव एक गणपती योजना राबविण्यात आली आहे. फलटण शहरात 60 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जाधववाडी, कोळकी, फरांदवाडी, ठाकुरकी, अलगुडेवाडी, झिरपवाडी, चौधरवाडी, धुळदेव, तावडी या 9 गावांमध्ये 72 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापणा केली आहे.
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 90 गावांपैकी 24 गावांमध्ये एक गाव एक गणपती योजना राबविण्यात आली आहे. उर्वरित 66 गावांमध्ये 108 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गजाननाची प्रतिष्ठापना केली आहे. फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या 36 गावांपैकी 13 गावात एक गाव एक गणपती योजना राबविण्यात आली आहे. उर्वरित 23 गावात 68 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे.
No comments