फलटण तालुक्यातील 41 ग्रामपंचातीवरील प्रशासक नियुक्ती आदेश

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्यातील 78 ग्रामपंचायतींच्या मुदती दि. 15 ते 27 ऑगस्ट आणि दि. 2 डिसेंबर रोजी संपत असून या सर्व मुदत संपलेल्या ग्रामपंचायती बरखास्त करुन तेथे शासकीय अधिकारी प्रशासक नियुक्तीच्या निर्णयानुसार सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी प्रशासक नियुक्तीची कार्यवाही सुरु केली असून पहिल्या टप्प्यात 41 ग्रामपंचायतीवर विस्तार अधिकार्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे. उर्वरित ग्रामपंचायत प्रशासक नियुक्ती 1/2 दिवसात करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
फलटण तालुक्यात दि. 15 व 21 ऑगस्ट आणि दि. 2 डिसेंबर रोजी प्रत्येकी 1, दि. 23 ऑगस्ट रोजी 17, दि. 24 ऑगस्ट रोजी 18, 25 ऑगस्ट रोजी 27, 27 ऑगस्ट रोजी 2, 26 ऑगस्ट रोजी 11 ग्रामपंचायत मुदती संपत असून त्यापैकी दि. 21 ऑगस्ट 1, दि. 23 ऑगस्ट 15, दि. 24 ऑगस्ट 14, दि. 25 ऑगस्ट 8 व दि. 26 ऑगस्ट 3 अशा एकुण 41 ग्रामपंचातीवरील प्रशासक नियुक्ती आदेश निर्गमीत झाले आहेत.
No comments