Breaking News

निकोप हॉस्पिटलचे सील काढले ; कोविड रुग्णांसाठी 10 बेड्स

 

            फलटण  दि 28 ऑगस्ट  (गंधवार्ता वृत्तसेवा ) - निकोप हॉस्पिटलच्या  स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी  सुविधांच्या माध्यमातून सर्वसाधारण व गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी तसेच  गरीब गरजू रुग्णांना महात्मा फुले योजनेंतर्गत उपचार उपलब्ध होण्याच्या द्रुष्टीने निकोप हहॉस्पिटलचे सील काढून ते खुले करण्यात येत असल्याचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी कळवले आहे.

        फलटण येथील डॉ. जे. टी. पोळ यांचे निकोप हॉस्पिटल अधिग्रहित करण्यात आले होते. परंतु निकोप हॉस्पिटल शासनास कोणत्याही प्रकारचे सहकार्य करत नसल्याचा ठपका ठेवत शासनाकडून  निकोप हॉस्पिटल सील करण्यात आले होते. 

        गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी तसेच  गरीब गरजू रुग्णांना महात्मा फुले योजनेंतर्गत उपचार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने निकोप हॉस्पिटलचे सील काढण्यातआले आहे.  निकोप हाॅस्पिटल हे 10 ICU बेड्स कोविड रुग्णांसाठी उपलब्ध करुन देत असल्याने व सदरचे काम अंतिम टप्प्यात असल्याने सदरचा निर्णय घेण्यात येत असले ते शिवाजीराव जगताप यांनी जाहीर केले.


No comments