Breaking News

384 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 728 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 

        सातारा दि. 31 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 384नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 728 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 7 कराड तालुक्यातील 67, खंडाळा तालुक्यातील 7, खटाव तालुक्यातील 11,  कोरेगाव तालुक्यातील 27, महाबळेश्वर तालुक्यातील 4, माण तालुक्यातील 22 पाटण तालुक्यातील 6, फलटण तालुक्यातील 36, सातारा तालुक्यातील 135, वाई तालुक्यातील 62  व असे एकूण 384 नागरिकांचा समावेश आहे.

728 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 14,  उपजिल्हा रुग्णालय फलटण 41, कोरेगाव 65, वाई 46, खंडाळा 79, रायगांव 48,  पानमळेवाडी 115, मायणी 43, महाबळेश्वर 53, पाटण 15, खावली 24, ढेबेवाडी 49  व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 136 असे एकूण 728 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. 

घेतलेले एकूण नमुने --   45057

एकूण बाधित --  13997

घरी सोडण्यात आलेले ---   7592

मृत्यू -- 397

उपचारार्थ रुग्ण -- 6008


No comments