Breaking News

सहकार महर्षी हणमंतराव पवार स्मृतिदिना निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रक्तदान शिबिर उद्घाटन प्रसंगी उपस्थित मान्यवर
             फलटण 12 ऑगस्ट (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) - श्रीराम बझार चे संस्थापक, सहकार महर्षी हणमंतराव पवार यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून 9 ऑगस्ट क्रांती दिननिमित्त  आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

           या शिबिराचे उद्घाटन नगरसेविका व स्वयंसिद्धा महिला संस्था समूहाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट सौ. मधुबाला भोसले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी श्रीराम बझार चे मार्गदर्शक संचालक महादेवराव पवार ,चेअरमन जितेंद्र पवार, व्हाईस चेअरमन दिलीपसिंह भोसले ,फलटण ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉक्टर बिपिन शहा ,श्रीराम बझार चे  संचालक सौ सुलोचना रायते, रवींद्र बेडकिहाळ,बापुराव गावडे आनंदराव बेलदार ,तुषार गांधी, आनंदराव शिंदे ,शिवाजीराव फडतरे ,श्रीराम कारखान्याचे व्हाईस चेअरमन नितीन भोसले, तेजसिंह भोसले ,मानाजीराव चव्हाण ,महादेव पोकळे, पोपटराव इवरे, सुभाष कर्णे, शितल अहिवळे, फलटण ब्लड बँकेचे अध्यक्ष डॉक्टर बिपिन शहा ,आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून शिबिरास सुरुवात झाली या शिबिरामध्ये 75 रक्तदात्यांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले.

No comments