फलटण तालुक्यात कोरोनाचे 12 पॉझिटिव्ह
फलटण दि 12 ऑगस्ट (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 12 ऑगस्ट रोजी आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण तालुक्यात 12 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये सोनवडी येथील 4 व्यक्ती, नांदल येथील 2 व्यक्ती फडतरवाडी, शिंदेवाडी, सासवड व कोऱ्हाळे येथील प्रत्येकी 1 व्यक्ती आणि फलटण शहरांमध्ये दत्तनगर 1 व्यक्ती व रविवार पेठ 1 व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
सोनवडी तालुका फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकटवर्ती संपर्कातील 39 वर्षीय पुरुष, 12 वर्षीय व 8 वर्षीय मुलगा व 35 वर्षीय महिला यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नांदल तालुका फलटण येथे पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकटवर्ती संपर्कातील 23 वर्षीय व 47 वर्षीय महिलांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फडतरवाडी तालुका फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकटवर्ती संपर्कातील 25 वर्षीय पुरुषाची कोविंड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. शिंदेवाडी तालुका फलटण येथील 70 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सासवड तालुका फलटण येथील 60 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोराळे तालुका फलटण येथील 49 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
फलटण शहरामध्ये दत्तनगर येथील 32 वर्षीय महिलेची covid-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तर रविवार पेठ येथील 64 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
No comments