Breaking News

रिपाई (आठवले गट)च्या फलटण तालुकाध्यक्ष पदी संजय निकाळजे तर शहराध्यक्ष पदी लक्ष्मण अहिवळे

 संजय निकाळजे यांना नियुक्त पत्र देताना विजय येवले, मधुकर काकडे, मुन्ना शेख, राजु मारुडा
            फलटण दि. 8 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाअध्यक्ष श्री.अशोकराव गायकवाड व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री चंद्रकांत अहिवळे यांच्या आदेशान्वये फलटण तालुका अध्यक्ष पदी श्री.संजय निकाळजे, शहर अध्यक्ष पदी श्री लक्ष्मण रमेश अहिवळे तसेच  तालुका महिला अध्यक्ष पदी श्रीमती विमलताई काकडे यांची निवड, पक्षाचे जिल्हा सचिव श्री विजय येवले, मधुकर काकडे, मुन्ना शेख, राजु मारुडा, यांचे प्रमुख उपस्थितित महात्मा फुलेनगर (कॉलनी) येथील सभागृहात करण्यात आली.
लक्ष्मण अहिवळे यांना नियुक्त पत्र देताना  मधुकर काकडे, विजय येवले, मुन्ना शेख, राजु मारुडा,तेजस काकडे 
      या निवडी दरम्यान श्री. सतिश अहिवळे तालुका उपाध्यक्ष, श्री.सचिन मारुती मोरे (दुधेबावी) तालुका उपाध्यक्ष,  श्री.दिपक शांताराम अहिवळे तालुका सचिव, श्री गोविद अरुण मोरे (सरडे) तालुका संघटक, शंकर पवार तालुका संपर्क प्रमुख, सागर लोंढे शहर यूथ अध्यक्ष, तेजस काकडे, शहर उपाध्यक्ष, अमित येवले शहर उपाध्यक्ष, प्रविण शेळके शाखा प्रमुख (सोमंथळी) यांची निवड करण्यात आली.

        सदरच्या निवडी या पक्षाच्या अटी व नियमानुसार करण्यात आल्या असुन, निवड केलेला पदाधिकारी अधिकृतपणे पदभार स्वीकारुन काम करतील असे यावेळी जिल्हा सचिव विजय येवले यांनी जाहीर केले.

No comments