सुविधा हॉस्पिटल हे 'कोविड हॉस्पिटल' म्हणुन अधिग्रहित

Suvidha Hospital acquired as 'Covid Hospital'
फलटण दि 28 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने, फलटण येथील खाजगी हॉस्पिटलांचे शासनाकडून अधिग्रहण सुरू आहे. फलटण येथील सुविधा हॉस्पिटल हे कोविड 19 हॉस्पिटल म्हणून अधिग्रहित करण्यात आले आहे.
सद्यःस्थितीत सातारा जिल्हयात कोरोना विषाणु बाधित रुग्णांमध्ये मोठया प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे. यापुढील काळात संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षता घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणुचे संसर्गात अधिक वाढु होवु न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे आवश्यक आहे. सदर बाधित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती सातारा जिल्हयात उद्भवु नये यासाठी पुर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे.
कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन अत्यावश्यक सेवेसाठी सुविधा हॉस्पिटल फलटण हे हॉस्पिटल कोविड-१९ बाधित रुग्णांवर उपचार करणेसाठी पुढील आदेश होईपर्यत अधिग्रहित करण्यात येत आहे.यामध्ये आपले संपुर्ण हॉस्पिटल चल अचल साहित्यासह कार्यरत असणारा सर्व स्टाफ अधिग्रहित करण्यात येत आहे. याकरीता आपण आपल्या हॉस्पिटल मध्ये सुसज्ज असा 30.. खाटांचा सुसज्ज विलगीकरण कक्ष तयार करुन सदर कक्षात व्हेंटीलेटर व इतर आवश्यक गोष्टीची तयारी ठेवण्यात यावी.तसेच रुग्णालयात विलगीकरण कक्ष (Isolation Facility) सुसज्ज ठेवुन Throat Swab घेण्याची तयारी करावी. सदर आदेश तात्काळ अमलात येईल याची दक्षता घेण्यात यावी असे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिले आहेत.
No comments