सातारा कोरोना: 85 संशयितांचे अहवाल बाधित; 296 नागरिकांना आज डिस्चार्ज
Satara Corona: Reports of 85 suspects Positive; 296 citizens discharged
सातारा दि.15 (गंधवार्ता वृत्तसेवा) - : क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयातील प्रयोगशाळेतील दि. 14 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील 85 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तर विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 296 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले असून 713 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरोनाबाधित अहवालामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 10, महाबळेश्वर 37, गोगवे 10.,
कराड तालुक्यातील कराड 1.,
सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहूली 1, सातारा 3, करंजे 1.,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, कुमठे 1, रहिमतपूर 1, मांडवे 3.,
खटाव तालुक्यातील मायणी 1, खटाव 3, वडूज 1.,
पाटण तालुक्यातील ढेबेवाडी 1.,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2.,
जावळी तालुक्यातील सरताळे 5., व
इतर 3
296 नागरिकांना आज डिस्चार्ज..
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 5, कराड तालुक्यातील 47, खंडाळा तालुक्यातील 33, खटाव तालुक्यातील 10, कोरेगांव तालुक्यातील 31, महाबळेश्वर तालुक्यातील 3, माण तालुक्यातील 3, पाटण तालुक्यातील 15, फलटण तालुक्यातील 23, सातारा तालुक्यातील 65, वाई तालुक्यातील 61 नागरिकांचा समावेश आहे.
713 जणांचे नमुने पाठविले तपासणीला..
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 64, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 30, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 21, कोरेगाव 38, वाई येथील 51, शिरवळ 65, रायगाव 56, पानमळेवाडी येथील 56, मायणी येथील 61, महाबळेश्वर येथील 50, पाटण 38, दहिवडी 21, खावली 90, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 72 असे एकूण 713 जणांचे नमुने पुणे, सातारा व कराड येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत अशी माहितीही अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने -- 35441
एकूण बाधित -- 6836
घरी सोडण्यात आलेले -- 3397
मृत्यू -- 214
उपचारार्थ रुग्ण -- 3225
No comments