फलटण तालुक्यात आणखी 6 पॉझिटिव्ह ; दि. 10 तारखेला दिवसभरात 10 पॉझिटिव्ह

फलटण दि 11 ऑगस्ट (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 10 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या रॅपिड ॲंटीजेन चाचणी मध्ये एकूण 6 व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे काल दि. 10 रोजी दिवसभरात एकूण 10 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. रॅपिड ॲंटीजेन चाचणीत फलटण शहरात 2 व्यक्ती, तांबखडा, आसू येथे 1, गिरवी 2, मिरढे 1 व्यक्तीची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
दि. 10 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या रॅपिड ॲंटीजेन चाचणी मध्ये एकूण 6 व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये फलटण शहरातील बुधवार पेठ धनगरवाडा येथील 80 वर्षे पुरुष यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, तसेच मंगळवार पेठ फलटण येथील 19 वर्षीय युवकाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
गिरवी तालुका फलटण येथील 40 व 42 वर्षे पुरुषांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तांबखडा, आसू येथील 55 वर्षीय पुरुषांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर मिरढे तालुका फलटण येथील 50 वर्षीय पुरुषाची कोविंड चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.
दि. 10 रोजी दुपारी आलेल्या अहवालामध्ये 4 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या, यामध्ये रविवार पेठ फलटण येथील 65 वर्षीय पुरुषांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती तर कोळकी तालुका फलटण येथील 11 वर्षीय मुलगा तसेच 38 वर्षीय पुरुष आणि 35 वर्षीय महिला यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली होती
No comments