Breaking News

फलटण तालुक्यात 4 कोरोना पॉझिटिव्ह

 

        फलटण दि 10 ऑगस्ट (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्यात आज 4 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामध्ये कोळकी तालुका फलटण येथील 3 व्यक्तींचा व फलटण शहरातील 1 व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

            रविवार पेठ फलटण येथील 65 वर्षीय पुरुषाची कोविड  चाचणी पॉझिटिव्ह आली आहे तर कोळकी तालुका फलटण येथील 11 वर्षीय मुलगा तसेच 38 वर्षीय पुरुष आणि 35 वर्षीय महिला यांची कोविड  चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रविवार पेठ येथील 65 वर्षीय पुरुषाला सारी या आजाराची देखील लक्षणे असून, कोळकी  येथील तिघेही रुग्ण पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या निकटवर्तीय संपर्कातील होते अशी माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

No comments