Breaking News

भारतात एका दिवसात 56,383 कोविड रुग्ण बरे होण्याचा विक्रम

 

Today Highest recoveries OF COVID-19 patients In india 

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट 2020 ऑगस्ट (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) - भारतात एका दिवसात सर्वाधिक 56,383 रुग्ण बरे होण्याच्या आणखी एका विक्रमाची नोंद झाली आहे. या आकड्यासह, कोविड-19 च्या बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आज जवळपास 17 लाखावर (16,95,982) पोहोचला आहे.

        केंद्र आणि राज्य / केंद्रशासित प्रदेश सरकारच्या एकत्रित, केंद्रित आणि सहयोगी प्रयत्नांसह लाखो आघाडीच्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्यामुळे, केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार स्टँडर्ड ऑफ केअरच्या माध्यमातून गंभीर स्वरूपाच्या रुग्णांचे प्रभावी क्लिनिकल व्यवस्थापन, गृह अलगीकरण यासारख्या उपाययोजनांच्या माध्यमातून चाचणी करणे, पाठपुरावा करणे आणि प्रभावी उपचारांची यशस्वी अंमलबजावणी सुनिश्चित केली आहे. रुग्ण बरे होण्याच्या संख्येत सतत होणाऱ्या वृद्धीमुळे रुग्ण बरे होण्याच्या दराने 70 % चा टप्पा पार केला आहे, कोविड-19 रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन मृत्यू दर 1.96% वर आला आहे आणि यात सतत घसरण होत आहे.

        रुग्ण बरे होण्याच्या विक्रमी नोंदीमुळे हे सुनिश्चित झाले आहे की देशातील कोविडच्या सक्रीय रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे आणि सध्या देशात एकूण रुग्णांपैकी 27.27 % सक्रीय  कोविड-रुग्ण आहेत. सक्रीय रुग्णांपेक्षा (6,53,622) बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10 लाखांहून अधिक आहे.

        कोविड-19 संदर्भात कुठलीही अधिकृत आणि ताजी आकडेवारी/माहिती हवी असल्यास, तसेच काही मार्गदर्शक तत्वे अथवा सूचना पाहायच्या असल्यास, कृपया खालील संकेतस्थळाला भेट द्यावी : https://www.mohfw.gov.in/

No comments