फलटण तालुक्यात 28 कोरोना पॉझिटिव्ह; फलटण शहर 23, कोळकी 1, पाडेगाव 1, मांडवखडक 1, कोराळे 1, साखरवाडी 1
28 corona positive in Phaltan taluka; Phaltan City 23, Kolaki 1, Padegaon 1, Mandvakhadak 1, Korale 1, Sakharwadi 1
फलटण दि. 14 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - आज सकाळी जाहीर करण्यात आलेल्या कोविड टेस्ट रिपोर्ट नुसार फलटण तालुक्यात 28 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. रेग्युलर लॅब मध्ये करण्यात आलेल्या चाचणी नुसार 12 जणांचे अहवाल कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. तर फलटण येथे करण्यात आलेल्या रॅपिड अँटिजेन टेस्ट मध्ये 16 जणांचे अहवाल कोविड पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 10 तर रॅपिड एंटीजन टेस्टमध्ये 13 असे एकूण 23 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोळकी 1, पाडेगाव 1, मांडवखडक 1, कोराळे 1, साखरवाडी 1, असे तालुक्यात एकूण 5 जणांचे अहवाल covid-19 पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला गावनिहाय तपशील खालीलप्रमाणे
फलटण शहरात बुधवार पेठ धनगर वाडा येथे 38 वर्षीय, 58 वर्षीय, 65 वर्षीय पुरुष, 3 वर्षीय बालिका, 31 वर्षीय, 54 वर्षीय, 59 वर्षे महिला यांच्या covid-19 पॉझिटिव्ह आल्या आहेत.
मंगळवार पेठ फलटण येथील 79 वर्षीय, पुरुष 32 वर्षीय महिला यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सोमवार पेठ फलटण येथील 33 वर्षीय पुरुषाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
फलटण तालुक्यात पाडेगाव येथे 47 वर्षे महिला आणि कोळकी येथील 67 वर्षीय पुरुष यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये मंगळवार पेठ,फलटण येथील 20 वर्षीय, 40 वर्षीय महिला, 20 वर्षीय, 24 वर्षीय, 26 वर्षीय पुरुष यांची कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
रविवार पेठ येथे 27 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष यांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. खाटीक गल्ली येथील 43 वर्षीय पुरुषाची, मेटकरी गल्ली येथील 53 वर्षे महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मलठण येथील 51 वर्षीय, 25 वर्षीय पुरुष तर लोहार गल्ली येथील 65 वर्षीय महिला, 76 वर्षे पुरुष यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
रॅपिड अँटिजेन टेस्टमध्ये तालुक्यात कोऱ्हाळे येथील 60 वर्षीय पुरुष, मांडवखडक येथील 69 वर्षीय पुरुष, साखरवाडी येथे 55 वर्षीय महिला यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.
No comments