हणमंतवाडी येथील गटार 4 महिन्यात वाहून गेले ; निकृष्ठ गटार बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल करावा - आर.पी.आय.
![]() |
हणमंतवाडी येथील वाहून गेलेले गटर |
फलटण दि. 28 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्यातील हणमंतवाडी येथे दलितवस्ती सुधार योजनेतुन बौद्ध वस्तीतील गटारा बांधण्यातआले होते. परंतु काम पूर्ण झाल्यानंतर केवळ 4 महिन्यात ते गटार वाहून गेल्याने, संबंधित गटाराची क्वालिटी कंट्रोल कडून तपासणी करण्याची मागणी केली जात होती. संबंधित ठेकेदाराने बांधकाम विभागातील अधिकार्यांना अर्थपूर्ण तडजोडीतुन निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. फलटण येथील बांधकाम विभागाचे अधिकारी या प्रकरणी गांधारीचे भूमिका घेऊन आहेत. त्यामुळे सदर ठेकेदारावर व संबंधित अधिकार्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत (मागासवर्गीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे ) गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) राष्ट्रीय अध्यक्ष दिपकभाऊ निकाळजे यांच्या , फलटण तालुका संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

मागणीचे निवेदन फलटण येथील तहसिल कार्यालयात नायब तहसिलदार ठोंबरे यांच्या कडे देण्यात आले. यावेळी फलटण तालुका अध्यक्ष अध्यक्ष संजय महादेव गायकवाड, फलटण शहराध्यक्ष महादेव गायकवाड, उपाध्यक्ष अजित मोरे उपस्थित होते.
निवेदानात पुढे म्हटले आहे कि,फलटण तालुक्यातील हणमंतवाडी येथील तब्बल 10 लाख रुपये निधीचे दलित वस्ती सुधार योजनेतील गटार बांधल्यानंतर केवळ 4 महिन्यातच वाहून गेल्याने असे निकृष्ट काम केलेल्या ठेकेदाराची चौकशी व्हावी.
जिल्हा परिषद सातारा बांधकाम विभागाच्या माध्यमातून फलटण येथील कार्यालयाच्या वतीने संबंधित ठेकेदाराची नेमणूक केली होती. संबंधित ठेकेदाराने बांधकाम विभागातील अधिकार्यांसह हणमंतवाडी ग्रामपंचायत प्रशासनाला हाताशी धरत अति निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले आहे.
दलित वस्ती सुधार योजनेतील हे गटार अतिशय निकृष्ट काम केल्यामुळे सार्वजनिक कामातही दलितांवरील अन्याय सुरू असल्याचे, या वरुन दिसते आहे. त्यामुळे या विषयी तात्काळ दखल घेत, सदर ठेकेदारावर व संबंधित अधिकार्यांवर ऍट्रॉसिटी अंतर्गत (मागासवर्गीय अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे ) गुन्हा दाखल करावा. अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
No comments