फलटण शहरात 13, विडणी 1 ; एकूण 14 कोविड पॉझिटिव्ह
कोरोना बाधित रुग्ण आढळलेला पेठ निहाय व गावनिहाय तपशील खालीलप्रमाणे
फलटण शहरातील खाटीक गल्ली येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाच्या निकटवर्ती संपर्कातील 7 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये 13 वर्षीय, 15 वर्षीय,18 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय, 14 वर्षीय, 19 वर्षीय, 45 वर्षीय महिलांचा समावेश आहे.
मारवाड पेठ येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकटवर्ती संपर्कातील 61 वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकटवर्ती संपर्कातील 40 वर्षीय महिला व सारी रोगाची लक्षण असणाऱ्या 44 वर्षीय पुरुषाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
रिंग रोड फलटण येथील सारी ची लक्षण असणाऱ्या 45 वर्षीय महिलेची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
सोमवार पेठ येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीचा निकटवर्ती संपर्कातील 35 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
रविवार पेठ येथील सारी रोगाची लक्षणे असणाऱ्या 55 वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
विडणी तालुका फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या निकटवर्ती संपर्कातील 22 वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
No comments