Breaking News

फलटण तालुक्यात आज 12 पॉझिटिव्ह रुग्ण


            फलटण दि. 5 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण तालुक्यासह शहरातील कोरोना बधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून, काल दि. 4 ऑगस्ट रोजी रात्री आलेल्या  कोविड (covid-19) च्या अहवालानुसार फलटण तालुक्यात 12 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये मुंजवडी येथील 7, कोळकी येथील 1, सोनवडी येथील 1, नांदल येथील 1, फडतरवाडी येथील 1  व फलटण शहरातील 1 व्यक्तीचा समावेश असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

            दि. 4 ऑगस्ट रोजी रात्री आलेल्या कोरोना अहवालानुसार फलटण तालुक्यात एकूण 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये मुंजवडी येथील 9 वर्षांची मुलगी, 36 वर्षांचा पुरुष, 32 वर्षांची महिला, 30 वर्षीय पुरुष, 15 वर्षांची युवती,  12 वर्षांची मुलगी, 11वर्षांचा मुलगा अश्या एकूण 7 जणांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्हआल्या आहेत. सोनवडी तालुका फलटण येथील 61 वर्षीय पुरुषाची कोविंड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. कोळकी तालुका फलटण येथील 75 वर्षीय पुरुषाची कोवीड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. नांदल तालुका फलटण येथील 26 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फडतरवाडी तालुका फलटण येथील 46 वर्षीय पुरुषाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर फलटण शहरामध्ये मंगळवार पेठ येथील 55 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणीही पॉझिटिव्ह आली असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

No comments