फलटण तालुक्यात 11 पॉझिटिव्ह ; राजाळे 5, शहरात सोमवार पेठ 4, लक्ष्मीनगर 2
फलटण 7 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि. 6 ऑगस्ट रोजी रात्री आलेल्या कोविड (covid-19) च्या अहवालानुसार 11 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. फलटण शहरात एकूण 6 रुग्ण, राजाळे येथे 5 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत.
दि. 6 ऑगस्ट रोजी रात्री आलेल्या कोरोना अहवालानुसार फलटण शहरातील सोमवार पेठ येथील 49 व 54 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 9 वर्षीय मुलगा यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. लक्ष्मीनगर येथील 12 वर्षीय मुलगी 41 वर्षीय पुरुषाची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
राजाळे तालुका फलटण येथील 9 वर्षीय, 15 वर्षीय, 17 वर्षीय मुलगी, 33 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगा यांच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
नागरिकांनी महत्त्वाचे काम असेल तरच बाहेर पडावे, बाहेर पडले तरी सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे, तोंडाला मास्क वापरावा, घरी आल्यानंतर प्रथम हात पाय स्वच्छ धुवावेत. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे म्हणजे कोरोना संसर्ग आपण थोपवू शकतो.
No comments