कोळकी येथे एक कोरोना पॉझिटिव्ह
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोळकी तालुका फलटण येथे आज दि. 2 जुलै रोजी 52 वर्षीय सारी पेशंटची कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. दरम्यान काल रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये घाडगेवाडी तालुका फलटण येथील एका व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी कळवले आहे.
मूळचे आंदरुड ता. फलटण येथील असणारे मात्र सध्या कोळकी ता. फलटण येथे राहणाऱ्या ५२ वर्षीय पुरुषाचा कोविड 19 चा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्ती ही ही सारी पेशंट असून या व्यक्तीची मुंबई वरून आल्याची ट्रॅव्हल हिस्ट्री आहे. तर मौजे घाडगेवाडी येथील ५८ वर्षीय पुरुष पुणे येथील मेंटल हाॅस्पिटल, येरवडा येथून, सेवेतून निवृत्त होऊन दि 30 जून 2020 रोजी फलटण येथे आले होते. त्यांच्यात लक्षणे असल्याने स्वॅबसाठी सातारा येथे पाठवण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट काल रात्री उशिरा दि. 1 जुलै रोजी पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली.

No comments