फळे व भाजी विक्रेत्यांनी ग्लोव्हज व मास्कचा वापर करावा अन्यथा दंडात्मक कारवाई - मुख्याधिकारी प्रसाद काटकर
नगरपालिका पथकातील कर्मचारी व अधिकारी यांनी दिलेले आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात येईल - मुख्याधिकारी प्रसाद काटकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - शहरातील सर्व दुकानदार फळे भाजी विक्रेते, यांना कळविणेत येते की कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व दुकानदार फळे भाजी विक्रेते यांनी हॅण्ड ग्लोज,मास्क याचा वापर करावा तसेच सायंकाळी५:०० वाजता आपले दुकान व हातगाडे बंद करावेत सायंकाळी ५:०० नंतर दुकान अथवा बाजारपेठ फळ विक्रेते (हात गाडे) दिसुन आल्यास, आपणावर दंडामक्त कारवाई करुन, हातगाड्या परवाना रद्द करणेत येईल असे फलटण नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी जाहीर केले आहे.
फलटण नगर परिषद कोविड-19 विषाणूचा फलटण नगर परिषद क्षेत्रातील प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेचा भाग म्हणून फलटण शहरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्ती, मास्क न घालणाऱ्या व्यक्ती, सोशल डिस्टेंसिंग न पाळणाऱ्या व्यक्ती यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याकामी नगर पालिकेच्या 4 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकांनी त्यांना नेमून दिलेल्या भागांमध्ये जे दुकानदार, फळे - भाजी विक्रेते यांनी हॅण्ड ग्लोज,मास्क याचा वापर केला नसेल त्यांच्यावर तसेच सायंकाळी ५:०० वाजता आपले दुकान व हातगाडे बंद केले नसतील त्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करतील असे आदेश मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी दिले आहेत .


No comments