शिंगणापूर जवळील कोथळे घाटात भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना नातेपुते पोलिसांनी केले जेरबंद
![]() |
आरोपींसह नातेपुते पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी व कर्मचारी |
राजुरी - सातारा - सोलापूर सिमेवर शिखर शिंगणापूर घाटात भाविकांना लुटणाऱ्या दरोडेखोरांना नातेपुते पोलीस स्टेशन मधील अधिकारी व कर्मचारी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून गोपनीय खबऱ्याकडून माहिती घेऊन सदरचे गुन्हेगार फलटण तालुक्यातील गोखळी गावामध्ये वीटभट्टी वर काम करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सदरचे आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी श्रीरामपूर व नाशिक नाशिक जिल्ह्यातील सिन्नर या ठिकाणावरून त्यांना जेरबंद करून मुसक्या आवळण्या मध्ये नातेपुते पोलिसांना यश आले आहे.
नातेपुते पोलिस स्टेशन कडून मिळालेल्या माहिती नुसार, उमरगा व चिवरी तालुका तुळजापूर येथील महिला भाविक जेजुरी येथे देवदर्शन करून, शिंगणापूर येथील महादेवाचे दर्शनासाठी चालले असता, नातेपुते पोलीस स्टेशन हद्दीत फलटण ते शिंगणापूर जाणारे रोड वरील मौजे कोथळे तालुका माळशिरस येथील, कोथळे घाटात दिनांक 11 /03/ 2020 रोजी रात्री 10 वाजता सुमारास त्यांची क्रुझर गाडी आडवून, अनोळखी सहा इसमानी गाडीच्या काचा फोडून, गाडीतील महिलांना व पुरुषांना शिवीगाळ दमदाटी करून 1 लाख 05 हजार सहाशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून नेले बाबत नातेपुते पोलीस ठाणे येथे चैतन्य सखाराम बडूरे ड्रायव्हर यवती तालुका तुळजापूर यांचे फिर्यादीवरून भाग 5 गुन्हा रजिस्टर नंबर 80/ 2020 भा.द.वि 395, 341, 427 ,504, 506 अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज कुमार पाटील अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचे सूचनेप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांचे मार्गदर्शनाखाली, नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे हे तपास करीत होते. सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनीय बातमीदार याचेमार्फत व तांत्रिक माहिती मिळवून सदर गुन्हा करणारे संशयित हे फलटण तालुक्यातील गोखळी गावात वीट भट्टी वर काम करत असले बाबत माहिती मिळाली सदर ठिकाणी चौकशी करता सदरची आरोपी हे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर व राहुरी तालुक्यातील असल्याचे समजले त्यामुळे सदर आरोपींचा शोध घेणे कामी नातेपुते पोलीस ठाणे कडील तपास पथक तयार करून आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केले आरोपींचा शोध घेत असताना संशयित इसम नमे १) राहुल आप्पासाहेब माळी वय 19 राहणार मुसळवाडी तालुका राहुरी, २) राहुल उर्फ टग्या एकनाथ बर्डे वय 22 राहणार पडेगाव तालुका श्रीरामपूर, ३)संदीप सुरेश पिंपळे वय 22 राहणार मानेगाव तालुका सिन्नर सध्या माणुरी तालुका राहुरी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा हा त्यांचे इतर साथीदार यांचे मदतीने केला असल्याचे कबूल केले. आहे सदर आरोपींना गुन्ह्याचे कामी अटक करून न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपींना दिनांक 06/07 /2020 पर्यंत पोलिस कस्टडी रिमांड मंजुरी केली असून, गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे हे करीत आहेत. उर्वरित चार आरोपींचा शोध चालू आहे.
सदरची कामगिरी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल गणपत गडदे ,शरद रामलिंग कदम ,राहुल सुग्रीव रणवरे, पोलीस नाईक महेश भास्करराव पाटील, पोलीस कॉन्स्टेबल राकेश माणिक लोहार व सायबर शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रवी हातकिले यांनी केलेला असून सदरचा गुन्ह्याचा अधिक तपास नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे करीत आहे.
No comments