अपघात केल्याच्या कारणावरून फलटण मध्ये एकाचे अपहरण करून दांडक्याने मारहाण
फलटण (गंधवार्ता ऑनलाइन) - कोळकी येथे अपघात करून तू पळून आला आहेस, असे म्हणून एकास रिंग रोड, फलटण येथे व नेऊन 10 ते 15 जणांनी लोखंडी व लाकडी दांडक्याने मारहाण केली. व नंतर पुन्हा मोटरसायकलवर बसवून त्यास मलठण येथे नेऊन तेथे मारहाण केली.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, सागर प्रशांत दोशी राहणार कोळकी तालुका फलटण यास दिनांक 29 जून 2020 रोजी दुपारी 4:30 ते 5 : 15 वाजण्याच्या दरम्यान, मनोज हिप्परकर, निलेश पवार व इतर अनोळखी 10 ते 15 इसम यांनी रिंग रोड डीएड कॉलेज चौक जवळील सेवन केक शॉप समोर, तू कोळकी येथे अपघात करून आला आहेस, असे म्हणून लाकडी दांडक्याने मारहाण केली, त्यानंतर सागर दोशी यास मोटारसायकलवर बसवून, त्यास मलटण येथे नेऊन, तिथेही शिवीगाळ व मारहाण करण्यात आली असल्याची फिर्याद सागर प्रशांत दोशी यांनी दिली आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करीत आहेत
No comments