Breaking News

फलटण शहरासह तालुक्यात 7 कोरोना पॉझिटिव्ह ; एकाचा मृत्यू


            फलटण दि.14 जुलै (गंधवार्ता वृत्तसेवा) - दि.14 जुलै रोजी उशिरा रात्री आलेल्या अहवालानुसार, फलटण शहरासह तालुक्यातील एकूण सात व्यक्तींच्या कोविड (covid-19) च्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. मौजे सरडे येथील 2 व्यक्ती, साखरवाडी ता. फलटण येथील 4 व्यक्ती तर फलटण शहरातील एक व्यक्तीचा यामध्ये समावेश आहे. दरम्यान फलटण शहरातील कोरोना बाधित महिलेचा आयसोलेशन सेंटर फलटण येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

            मौजे सरडे येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या (वडील) निकट संपर्कातील ७ वर्षांची मुलगी व ४ वर्षांचा मुलगा यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.  मौजे साखरवाडी येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील ३३ व ५२ वर्षीय महिला तसेच १८ वर्षीय मुलगी व १४ वर्षीय मुलगा यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
             बुधवार पेठ, फलटण  येथील ५७ वर्षीय महिलेची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सदर महिलेचा स्वॅब घेतल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाच्या आयसोलेशन सेंटरमध्ये दाखल असताना मृत्यू झाला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

No comments