Breaking News

दैनिक गंधवार्ता वेबपोर्टलचे महिन्यात 2 लाख 15 हजार विव्हीअर्स



            फलटण (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) - दैनिक गंधवार्ताच्या वेब पोर्टलला वाचकांनी अल्पावधीत लोकप्रिय केले असून, एक महिन्यातच 215 K  म्हणजेच 2 लाख 15 हजार विव्हीअर्स झाले आहेत. दैनिक गंधवार्ताच्या वेब पोर्टलला भेट देणाऱ्या विव्हीअर्सचा आकडा हा गुगल  द्वारे अधिकृत करण्यात आला आहे. प्रत्येक बातमीला किती व्हिव्ह्ज मिळाले ते देखील जाहीर केले जाते. सरासरी दररोज 7 ते 10 हजार युजर्स दैनिक गंधवार्ता पोर्टल ला भेट देत आहेत.

             दिनांक 15 जून 2020 पासून सुरू झालेल्या दैनिक गंधवार्ता वेबपोर्टलला वाचक वर्गाने अल्पावधीतच प्रसिद्ध केले आहे.  वास्तविक दि. 15 जून ते 20 जून पर्यंत दैनिक गंधवार्ता वेबपोर्टल अंडर-कन्स्ट्रक्शन होते आणि खऱ्या अर्थाने दि. 21 जून पासून सुरू झालेल्या या पोर्टलला दिनांक 21 जून ते 15 जुलै पर्यंत रोज सरासरी 7 ते 10 हजार नेटीझन्सनी भेट देऊन, 26 दिवसात दैनिक गंधवार्ता वेब पोर्टल ला भेट देणाऱ्या नेटिझन्सची संख्या 2 लाख 15 हजार केली आहे.

            आकर्षक डिझाइन व उत्कृष्ट मांडणी असणाऱ्या दैनिक गंधवार्ता पोर्टल च्या बातम्या ही तितक्याच दर्जेदार आहेत अशा कमेंट्स दैनिक गंधवार्ता वेब पोर्टलला मिळू लागल्या आहेत. दि. 29 जून रोजी दैनिक गंधवार्ता वेब पोर्टलला सर्वात जास्त 17742 व्हिव्ह्ज मिळाले आहेत. तर त्या खालोखाल  दि. 5 जुलै रोजी 16328 व्हिव्ह्ज, दि.3 जुलै रोजी 15197 व्हिव्ह्ज, दि. 6 जुलै रोजी 14334 व्हिव्ह्ज, दि. 11 जुलै रोज 14267 व्हीव,  12 जुलै 14333 युजर्सनी दैनिक गंधवार्ता वेब पोर्टल ला भेट दिली. आणि दिनांक 15 जून 2020 पासून आज दि. 15 जुलै 2020 पर्यंत 2 लाख 15 हजार 62 जणांनी भेट दिली आहे, ही आकडेवारी गूगल द्वारा प्रसिद्ध करण्यात आलेल्या पोर्टल वरून घेण्यात आली आहे.

No comments