Breaking News

फलटण तालुक्यात आज 14 पॉझिटिव्ह ; मुंजवडी 8, फलटण शहर 5 व सासवड 1


            फलटण दि. 30 जुलै (गंधवार्ता वृत्तसेवा) - आज आलेल्या कोरोना चाचणी अहवालात फलटण तालुक्यात 14 कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुंजवडी ता. फलटण येथील 8 रुग्णांचासासवड ता. फलटण येथील 1 रुग्णांचा समावेश आहे. तर फलटण शहरात जिंती नाका येथील 3 रुग्ण, रविवार पेठ येथील 1 व लक्ष्मीनगर येथील 1 रुग्ण  असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

            दिनांक 30 जुलै 2020 रोजी  आलेल्या covid-19 चाचणी अहवालामध्ये मौजे मुंजवडी फलटण येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील २०, ३९ व ४५ वर्षीय पुरुष/मुले तसेच ४, १३, १४, १७ व ३५ वर्षीय मुली/महिला यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
मौजे सासवड  येथील ६४ वर्षीय पुरुष यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

            फलटण शहरात जिंती नाका, फलटण  येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीच्या निकट संपर्कातील १८ वर्षीय पुरुष तसेच  ३३ व ७४ वर्षीय महिला यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. रविवार पेठ फलटण येथील २७ वर्षीय महिला तसेच लक्ष्मीनगर फलटण येथील ५७ वर्षीय पुरुष यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आज 30 जुलै रोजी एकूण 14 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले असून शिंगणापूर, माण येथील व्यक्तीचा फलटण येथे घेतलेला स्वॅब पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

No comments