Breaking News

सहकारमहर्षी हणमंतराव पवार हायस्कूलचा 10 वीचा निकाल 96.77 टक्के


            जाधववाडी दि. 30 जुलै (गंधवार्ता वृत्तसेवा) -  फलटण  येथील श्री.सद्गुरु हरिबुवा महाराज शिक्षण संस्थेचे  सहकारमहर्षी हणमंतराव पवार हायस्कूल, फलटण  चा एस.एस.सी परीक्षा 2020 चा निकाल 96.77 % लागला आहे.

                शालेय स्तरावर निकिता बनकर 95.80% गुण मिळवुन  प्रथम  क्रमांक मिळवला आहे. स्नेहल गायकवाड हिने  95.60% गुण मिळवून द्वितीय  क्रमांक मिळवला आहे. तर संपदा खोपडे हिने 95.20% गन मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे. विशेष प्राविण्य 20 मुले,व प्रथम श्रेणी 24 मुले उत्तीर्ण झाले आहेत.
    
               सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे  श्री.सद्गुरू हरिबुवा महाराज शिक्षण  संस्थेचे संस्थापक  दिलीपसिंह भोसले ,अध्यक्ष  तुषार भाई गांधी, सचिव ॲड.  सौ. मधुबाला भोसले,.प्राचार्य राजेंद्र रेपाळ,सर्व  पदाधिकारी , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी  अभिनंदन केले.

No comments