Breaking News

फलटणच्या मंगळवार व रविवार पेठेतील परिसर केंटेन्मेंट झोन म्हणून घोषित



फलटण (प्रतिनिधी) - फलटण शहरामध्ये दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असल्यामुळे, मंगळवार पेठेतील जुना बारामती चौक ते माता रमाई चौक व भगवान सॉमिल पर्यंतचा परिसर  सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (कंटेनमेंट झोन)  म्हणून घोषित करण्यात आले आहे तसेच  रविवार पेठेतील  जुना बारामती चौक  ते भापकर बिल्डींग व  डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन  (समाज मंदिर) पर्यंतचा  परिसर  सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र म्हणून  घोषित करण्यात आले आहे तर  उर्वरित मंगळवार पेठ व रविवार पेठेचा परिसर बफर झोन म्हणून  घोषित करण्यात आला असल्याचे इन्सिडेंट कमांडर  तथा  उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी जाहीर केले आहे.

फलटण नगरपरिषद हददीमधील मंगळवार पेठ येथे दि. 12 जून 2020 रोजी अमृतसर येथून वरुन १ व्यक्ती आली होती. सदर व्यक्तीस लक्षण आढळून आल्याने त्यांना सिव्हिल हॉस्पीटल सातारा येथे दाखल करणेत आले. त्याच दिवशी दि.13 जून 200 रोजी सदर व्यक्तीथा स्वेब घेणेत आलेला होता .सदर स्वैंबचा अहवाल दि.14 जून 2020 रोजी पॉझिटिव्ह आल्याने, सदर व्यक्ती केविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले आहे.  मंगळवार पेठ येथील सदर रुग्णाचे सानिध्यातील १० नातेवाईक यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल केले आहे.  फलटण नगरपरिषद हददीमधील मंगळवार पेठ येथील बारामती चौक ते माता रमाई चौक ते भगवान सॉ मिल ते बारामती चौक हा परिसर सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र व फलटण नगरपरिषद हृद्दीमधील मंगळवार पेठ परिसर हा बफर झोन म्हणून घोषीत करण्यात आला असल्याचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी जाहीर केले आहे.

फलटण नगरपरिषद हददीमधील रविवारपेठ येथे दि. 09 जून 2020 रोजी सोलापूर वरुन एक महिला  आल्या होत्या. सदर महिला  दि. 12 जुन 2020 रोजी मयत झाल्या. मयत झलेनंतर दि. 12 जून 2020 रोजी सदर व्यक्तीचा स्वैब घेण्यात आला होता .सदर स्वैबचा अहवाल दि.14 जुन 2020  रोजी पॉझिटिव्ह आल्याने सदर व्यक्ती काविड- १९ पॉझिटिव्ह असल्याचे सिद्ध झाले. रविवार पेठ येथील सदर रुग्णाच्या सानिध्यातील २२ नातेवाईक यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये दाखल केले आहे. रविवारपेठ येथील बारामती चौक ते श्री थोरात स्वस्त धान्य दुकान ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजमंदीर ते भापकर बिल्डिंग लक्ष्मी निवास ते बारामती चौक हा परिसर सुक्ष्म प्रतिबंधीत क्षेत्र  व फलटण नगरपरिषद हद्दीमधील रविवार पेठ परिसर हा बफर झोन म्हणुन घोषीत करण्यात आला असल्याचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी जाहीर केले आहे.

No comments