ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल व महाविद्यालयाला आयएसओ मानांकन
फलटण (प्रतिनिधी) - : ईश्वरकृपा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गुणवरे, ता. फलटण येथे सुरू असलेल्या ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयास आयएसओ मानांकन प्राप्त झाले असून, या विद्यालयात दि. १० जूनपासून नर्सरी ते इयत्ता ७ वी पर्यंतच्या वर्गांसाठी ऑनलाइन टिचिंग सुरू करण्यात आले आहे. या सन्मानाबद्दल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ईश्वर गावडे आणि संस्थेच्या सचिव सौ. साधना गावडे यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.
![]() |
सौ. साधना गावडे |
झूम अॅपद्वारे ऑनलाइन शिक्षणाची सुविधा ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने सर्वप्रथम सुरू करून शिक्षण क्षेत्रातील आपली आघाडी कायम राखताना विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि त्यामधील गुणवत्तेला प्राधान्य देण्याची आपली परंपरा कायम ठेवली आहे.
गुणवरेसारख्या ग्रामीण भागात शहरी भागा प्रमाणे प्रशस्त इमारत, सुसज्ज फर्निचर, ग्रंथालय, खेळाची साधने व अन्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या या विद्यालयाने गुणवत्ता पूर्ण शिक्षणासाठी तितकाच दर्जेदार शिक्षकवर्ग उपलब्ध करून दिला असल्याने, या विद्यालयाने गुणवत्तावाढीसाठी केलेले प्रयत्न आणि त्यातून शहरी भागाइतकेच गुणवान व दर्जेदार विद्यार्थी निर्माण करण्याची परंपरा अखंडित सुरू ठेवल्याने या विद्यालयात प्रवेशासाठी पालक व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होत आहे.
गुणवरेसारख्या छोट्या खेड्यात असलेले हे विद्यालय शिक्षणाच्या बाबतीत खेडे किंवा शहर हा निकष बाजूला ठेवून शहरी भागाइतकेच दर्जेदार शिक्षण इथल्या विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे ही भूमिका प्रारंभापासून घेवून इमारत, शैक्षणिक साधने सुविधा आणि गुणवत्ताधारक शिक्षक याला प्राधान्य देत असल्याने नेहमीच या विद्यालयाचे शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील यशाबद्दल कौतुक होत आहे. त्यातून नव्याने आयएसओ मानांकन प्राप्त झाल्याने विद्यालयाच्या सर्व क्षेत्रातील गुणवत्तेवर सन्मानाची आणि यशस्वितेची मोहोर लागली आहे.
या यशाबद्दल संस्थेच्या सचिव सौ. साधना गावडे व त्यांचे सहकारी सर्व शिक्षकांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.
No comments