25 जून 1983 : जेव्हा भारताने जगावर विजय मिळवला
(अॅड. रोहित अहिवळे) -
25 जून, याच दिवशी तब्बल 37 वर्षांपूर्वी भारतानं पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला ते ही दोन वेळा चॅम्पियन असणाऱ्या वेस्ट इंडिजला नमवत. कोट्यावधी भारतीयांसाठी तो सुवर्ण दिवस होता. कोणी विचारही नव्हता केला असा इतिहास 25 जून 1983 साली घडला. त्याचे शिल्पकार होते, भारताचे तेव्हाचे कर्णधार कपिल देव आणि त्यांचे साथीदार.
भारतीय संघ दोन वेळा चॅम्पियन बनलेल्या वेस्ट इंडिज संघाला आणि ऑस्ट्रेलियाला एकदा तर, झिंम्बावेला दोन वेळा हरवून सेमीफायनपर्यंत आला होता. मात्र इंग्लंडमध्ये सेमीफायनलमध्ये कमाल केली ती अमरनाथ यांनी. पहिल्यांदाच सेमीफायनलमध्ये पोहचलेल्या भारतीय संघानं आपला दबदबा सेमीफायनलमध्येही कायम राखला. पण त्यांचा सामना होता तो, इंग्लंडविरोधात. मात्र मोहिंदर अमरनाथ यांनी गोलंदाजीमध्ये कमाल दाखवत 27धावा देत 2 विकेट घेतल्या होत्या. तर, फलंदाजीमध्ये मॅच विनिंग 46 धावांची खेळी केली होती. या सामन्यात अमरनाथ यांना सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.
इंग्लंडला नमवल्यानंतर भारताचा सामना होता तो, वेस्ट इंडिज संघाशी. लॉर्ड्स मैदानावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात अंतिम लढत होती. वेस्ट इंडिज संघाने सलग दोन वर्ल्ड कप जिंकले होते आणि ते सलग तिसऱ्या फायनलमध्ये पोहोचले होते. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचा डाव ५४.४ षटकात फक्त १८३ धावांवर संपुष्ठात आला. के.श्रीकांत यांनी सर्वाधिक ३८ धावा तर मोहिंदर अमरनाथ यांनी २६ धावा केल्या.
विजयासाठी फक्त १८४ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाने जल्लोषाची तयारी केली होती. पण टीम इंडियाच्या मनात काही वेगळेच सुरू होते. वेस्ट इंडिजची पहिली विकेट ५ धावांवर पडली. त्यानंतर पुढच्या ६१ धावात वेस्ट इंडिजची अवस्था ५ बाद ६६ अशी झाली. वेस्ट इंडिजची पाचवी विकेट त्यांचा कर्णधार सर क्लाइव्ह लॉईड यांची होती. या सामन्यात कपिल देवने व्हिव्ह रिचर्ड्सचा शानदार असा कॅच घेतला होता.
![]() |
१९८३ चा विश्वचषक विजेता भारतीय संघ |
त्यानंतर वेस्ट इंडिजा डाव ५२ षटकात १४० धावात संपुष्ठात आला आणि भारताने ४३ धावांनी विजय मिळवत पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली. भारताकडून अमरनाथ आणि मदनलाल यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या होत्या.
No comments