बुधवारी एका दिवसात 16868 कोरोनाचे रुग्ण
नवी दिल्ली - देशात कोरोना संक्रमितांची संख्या 4 लाख 72 हजार 870 झाली आहे. गेल्या आठवड्यात म्हणजेच 18 ते 24 जूनपर्यंत संक्रमितांची संख्या सर्वात जास्त तेलंगानामध्ये वाढली आहे. येथे ग्रोथ रेट 12% राहिली आहे. तर देशातील सर्वात जास्त टॉप टेन संक्रमित राज्यांमध्ये हे राज्य 10 व्या नंबरवर आहे. दूसऱ्या नंबरवर दिल्ली आणि तिसऱ्या नंबरवर दोन राज्य तामिळनाडू आणि हरियाणा आहे. येथे रोज जवळपास 5 % या दराने रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्रात रुग्णांचा ग्रोथ रेट जवळपास 3 % राहिला आहे.
बुधवारी एका दिवसात सर्वात जास्त 16 हजार 753 केस वाढले. हा आकडा आतापर्यंतचा सर्वात जास्त आकडा आहे. यापूर्वी 20 जूनला 15 हजार 918 संक्रमित सापडले होते. गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त 3890 संक्रमित समोर आले आहेत. दिल्लीमध्ये 3788 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. आता येथे 70 हजार 390 रुग्ण झाले आहेत. हे मुंबईपेक्षा 2 हजार जास्त आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशात कोरोनाचा रिकिव्हरी रेट 6 % वाढून 56.38% झाला आहे.
No comments