Breaking News

22 वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या



फलटण ( दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) - मंगळवार पेठ, फलटण येथील 22 वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजले नाही.

फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार ,बुधवार दि. १७ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास अनुज अनिल सोनवणे वय २२ वर्ष याने कोणत्या तरी कारणास्तव राहते घरात किचन रूम मध्ये घराच्या वाशाला साडीच्या सहाय्याने गळफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाला. दिलेल्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मयत रजिस्टर नंबर - 28/2020 सीआरपीसी 174 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची फिर्याद सिद्धार्थ माधवराव मोरे वय ५२ वर्ष व्यवसाय मजुरी राहणार मंगळवार पेठ फलटण यांनी दिली आहे. सदर मयत तरुणाच्या घरी आज्जी व वडील राहात असून मयत तरुण हा फलटण येथील गोविंद डेअरी मध्ये कामाला होता. आत्महत्येचे कारण समजले नसून पुढील तपास फलटण शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विरकर करत आहेत.

No comments