Breaking News

पावसामुळे फलटण तालुक्यात 2 लाख 79 हजार रुपयाचे नुकसान


     
   फलटण (दैनिक गंधवार्ता वृत्तसेवा) -  गुरुवार दिनांक 25 जून 2020 रोजी झालेल्या पावसामुळे फलटण तालुक्यातील शेती पिकाचे व घरांचे सुमारे 2 लाख 79 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

फलटण तालुक्यात दिनांक 25 जून रोजी झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे व घरांचे नुकसानीबाबत तहसील कार्यालयाकडून पंचनामे करण्यात आले असून, पावसामुळे एकूण 2 लाख 79 हजार 500 रुपयांचे नुकसान झाले आहे. ठाकुरकी येथील 1 कच्चे घर याचे अंशतः नुकसान झाले. नुकसानीची अंदाजे रक्कम 12 हजार रुपये. खुंटे येथील 3 कच्ची घरे यांचे अंशत: नुकसान झाले आहे. नुकसानीची  अंदाजे रक्कम तीन हजार रुपये. राजुरी येथील एक पक्के घर अंशता नुकसान झाले असून  नुकसानीची  अंदाजे रक्कम 33 हजार रुपये. जावली येथील एक कच्चे घर अंशता  नुकसान झाले असून नुकसानीची  अंदाजे रक्कम  पंधरा हजार रुपये. कांबळेश्वर येथे  दोन  शेळ्या, 9 कच्ची घरे  व दोन पक्की घरे यांचे नुकसान झाले असून नुकसानीची अंदाजे रक्कम 1 लाख 72 हजार 500 रुपये.  जिंती येथील एका कच्चा घराचे नुकसान झाले असून  नुकसानीची अंदाजे रक्कम 30 हजार रुपये. फडतरवाडी येथील एक पक्क्या घराचे नुकसान तसेच एक गोठा व साग वृक्षाची आठ झाडे असे  नुकसान झाले आहे. नुकसानीची अंदाजे रक्कम एकूण 1 लाख 40 हजार रुपये. असे फलटण तालुक्यातील एकूण मिळून दोन लाख 79 हजार पाचशे रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.


No comments