Breaking News

महात्मा गांधी जयंतीनिमित्त फलटण काँग्रेसच्या वतीने अभिवादन

Greetings from Phaltan Congress on the occasion of Mahatma Gandhi Jayanti

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि २ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त फलटण तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गजानन चौक येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

    राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी डॉ. सचिन भैय्या सूर्यवंशी (बेडके) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी (बेडके), शहर अध्यक्ष तथा नगरसेवक पंकज पवार, सामाजिक कार्यकर्ते अमीर भाई शेख, सिकंदर डांगे, अशोकराव भोसले यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

    यावेळी मनोहर गायकवाड, ताजुद्दीन बागवान, बालमुकुंद भट्टड, गंगाराम रणदिवे, बालमभाई शेख, लक्ष्मण तात्या शिंदे, अल्ताफ पठाण, अजय इंगळे, विकास ननावरे, मंजेखान मेटकरी, नितीन जाधव, धनंजय गोरे, अमोल नलवडे, प्रमोद शहा, पोपट शिंदे, संतोष बाचल, हारून इनामदार, मनमोहन बरसावडे, भारत अहिवळे आदी उपस्थित होते.

No comments