Breaking News

मौलाना आझाद अल्पसंख्याक शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावा - जमशेद पठाण

Take advantage of Maulana Azad Minority Educational Loan Scheme - Jamshed Pathan

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. ५ : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विभागांतर्गत कार्यरत असलेल्या मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन मुस्लिम ओबीसी संघटनेचे अध्यक्ष तथा पत्रकार जमशेद पठाण यांनी केले आहे.

    या योजनेअंतर्गत मुस्लिम, बौद्ध, जैन, शीख, पारशी आणि ख्रिश्चन समाजातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. भारतात व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ लाख रुपयांपर्यंत कर्ज मंजूर करण्यात येते. तसेच परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २० ते ३० लाख रुपयांपर्यंत कर्जाची सुविधा उपलब्ध असल्याचे पठाण यांनी सांगितले.

    अल्पसंख्याक समाजातील अनेक होतकरू विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे उच्च व व्यावसायिक शिक्षणापासून वंचित राहतात. अशा विद्यार्थ्यांसाठी ही योजना उपयुक्त असून, पात्र विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आवश्यक कागदपत्रांसह योजनेची माहिती घेऊन अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

    सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक कर्ज योजनेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे जमशेद पठाण यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी ८१७७८७१२२१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments