Breaking News

जिद्द, चिकाटी व अथक परिश्रमातून डॉ. प्रज्ञा आगवणे यांचे वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग यश

Dr. Pragya Agavane's outstanding success in the medical field.

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२८ : जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर फलटणच्या डॉ. प्रज्ञा प्रविण आगवणे यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. एम.बी.बी.एस.चे शिक्षण गुणवत्तेत पूर्ण केल्यानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये महाराष्ट्रातील अग्रगण्य वैद्यकीय महाविद्यालयांपैकी एक असलेल्या महात्मा गांधी मिशन्स मेडिकल कॉलेज, कामोठे, नवी मुंबई येथे एम.डी. पॅथॉलॉजी या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी गुणवत्तेच्या आधारे त्यांची निवड झाली.

    डॉ. प्रज्ञा या फलटणमधील तुलसी अ‍ॅक्सिडेंट अ‍ॅण्ड जनरल हॉस्पिटलचे अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. प्रविण आगवणे व त्वचारोग व कॉस्मेटिक स्पेशालिस्ट डॉ. सौ. दिपा आगवणे यांच्या कन्या आहेत. गेल्या २८ वर्षांपासून आगवणे दाम्पत्य फलटण व परिसरातील रुग्णांना वैद्यकीय सेवा देत असून, त्यांच्या वैद्यकीय सेवेचा वारसा पुढील पिढीही पुढे नेण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

    डॉ. प्रज्ञा यांच्या एम.डी. पॅथॉलॉजीच्या शिक्षणादरम्यान त्यांच्या संशोधन प्रबंधाची राष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे. भारत सरकारच्या आरोग्य संशोधन विभागाच्या (DHR) अंतर्गत इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) कडून ही शिष्यवृत्ती मिळाल्याचे आगवणे कुटुंबीयांनी सांगितले. वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात ही शिष्यवृत्ती महत्त्वपूर्ण मानली जाते असून, पुढील संशोधन तसेच परदेशातील संशोधनाच्या संधींसाठीही तिचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

    या शैक्षणिक व संशोधनाच्या वाटचालीत महात्मा गांधी मिशन्स मेडिकल कॉलेज, कामोठे, नवी मुंबई येथील पॅथॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. शिल्पी साहू तसेच विभागातील सर्व प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्याचे डॉ. प्रज्ञा यांनी सांगितले.

    आगवणे कुटुंबातील दुसरे अपत्य हर्षवर्धन प्रविण आगवणे हेही सध्या एम.बी.बी.एस.च्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहेत. डॉ. प्रज्ञा यांच्या यशाबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अॅड. सौ. जिजामाला नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर, सौ. मनीषा नाईक निंबाळकर तसेच युवा नेते व स्वराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित भैय्या नाईक निंबाळकर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments