सद्गुरू हरिबुवा शिक्षण संस्थेत राखी बनविणे कार्यशाळा उत्साहात संपन्न
कोळकी (गंधवार्ता वृतसेवा) - शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला वाव मिळावा, तसेच रक्षाबंधनाच्या सणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे या उद्देशाने शिवम प्रतिष्ठान घारेवाडी, शाखा फलटण च्या वतीने राखी बनविणे कार्यशाळेचे आयोजन सद्गुरू हरिबुवा शिक्षण संस्थेत करण्यात आले.
या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी विविध रंगांचे धागे, मणी, मोती, कागद व इतर सजावटीच्या साहित्याचा वापर करून आकर्षक व सुंदर राख्या तयार केल्या.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपल्या कल्पकतेतून विविध प्रकारच्या राख्या साकारल्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना राखी तयार करण्याच्या विविध पद्धती समजावून सांगत मार्गदर्शन केले. तयार झालेल्या राख्यांचे प्रदर्शनही भरविण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, कलाकौशल्य, स्वावलंबन व बंधुभावाची भावना विकसित होण्यास मदत झाली. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजना उपशिक्षिका निशुता गोरे वनिता वाघ शोभा माळी प्राजक्ता सोनवणे यांनी प्रयत्न केले.मुख्याध्यापक, शिक्षक, पालक यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

No comments