Breaking News

अहिल्यानगरच्या धारकऱ्यांकडून आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर महाराजसाहेबांचा सत्कार

MLA Shrimant Ramraje Naik Nimbalkar Maharaj Saheb was felicitated by the holders of Ahilyanagar

     फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि १७ ऑगस्ट  २०२६ :- अहिल्यानगर येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आज फलटण दौऱ्यावर आले असता त्यांनी आमदार श्रीमंत रामराजे नाईकनिंबाळकर महाराजसाहेब यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी धारकऱ्यांनी महाराजसाहेबांना फेटा बांधून त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. भेटीदरम्यान धारकऱ्यांनी महाराजसाहेबांप्रती असलेला आदर व जिव्हाळा व्यक्त केला.

    तसेच महाराजसाहेबांची आठवण कायमस्वरूपी जपता यावी, यासाठी धारकऱ्यांनी त्यांची स्वाक्षरी घेतली. या भेटीमुळे धारकरी आणि महाराजसाहेब यांच्यातील स्नेहपूर्ण संबंध अधोरेखित झाले.

    यावेळी झालेल्या या सदिच्छा भेटीचा आनंददायी क्षण धारकऱ्यांनी आपल्या आठवणीत कायमस्वरूपी जपला.

No comments