Breaking News

ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुणवरे मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Independence Day celebrated with enthusiasm at Bloom English Medium School and Junior College, Gunavare

फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि. १७ ऑगस्ट -
          भारत अमुचा प्राण,
          तिरंगा त्याची शान 

    या उक्तीप्रमाणे ईश्वरकृपा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ब्लूम इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज गुणवरे येथे भारताचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून इयत्ता दहावी मध्ये प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थिनीचे पालक श्री. प्रल्हाद निकम उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ईश्वरतात्या गावडे अध्यक्ष ईश्वर कृपा शिक्षण प्रसारक मंडळ यांनी भूषविले. यावेळी श्री. प्रल्हाद निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी सई निंबाळकर आणि अर्थश्री बनकर यांनी केले. इयत्ता सहावी, आठवी आणि नववीतील विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत , राज्यगीत , झेंडागीत, देशभक्तीपर गीत उत्तम प्रकारे सादर केले. इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड परेड करून शिस्तीचे प्रतीक दर्शवले. इयत्ता नर्सरी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी एकजुटीचे प्रतीक म्हणून विविध संगीतमय कवायत प्रकार सादर केले .यावेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून ध्वजाला मानवंदना देण्यात आली. इयत्ता नर्सरी ते तिसरीतील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सामाजिक, आर्थिक, देशभक्ती, सांस्कृतिक वारसा अशा विविध विषयांवर भाषणे करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला.

    यावेळी मंथन, स्कॉलरशिप, DTSE आणि इस्रो व्हिजिट परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष श्री ईश्वर गावडे , अकलूजचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्ग (१) श्री. संभाजी गावडे आणि संस्थेच्या सचिव सौ. साधनाताई गावडे  यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला. 

    शाळेचे प्राचार्य श्री. गिरीधर गावडे सर यांनी हा कार्यक्रम सुरुवातीपासून शेवटपर्यंत विद्यार्थ्यांनी उत्तमरीत्या साजरा केला त्याबद्दल सर्वांचे कौतुक केले. संस्थेच्या सचिव सौ. साधना गावडे व संचालक अकलूजचे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी वर्ग (१)श्री संभाजी गावडे यांनी  स्वातंत्र्यदिनानिमित्त  विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी वेदिका करे हिने केले. कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. 

    विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून वंदे मातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राचार्य श्री. गिरीधर गावडे सर, उपप्राचार्यो सौ. पुनम जाधव, व्यवस्थापिका सौ. सोनाली मोरे तसेच सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी सहकार्य केले.

No comments